Home Breaking News घुग्घुस आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन

घुग्घुस आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन

287

घुग्घुस आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.७ फेब्रुवारी २०२५ शुक्रवार रोजी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण,पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक महिल्यानी गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.

यावेळी आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातुन जेष्ठ मान्यवरांनी म्हनाले कि भारतरत्न, महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या जीवनात मोठा वाटा आहे! समाजात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आपुलकीची भावना आहे, ज्यांची जयंती ७ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी केली जाते.
बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि सहिष्णुतेची मूर्ती, माता रमाई यांनी समाजासाठी महान त्याग केला आहे.

याप्रसंगी सुचिताताई लुटे,कुसुमबाई सातपुते,सुनिता पाटिल,संध्या जगताप,माया मांडवकर,उज्वला उईके,सविता गोहणे,सुशिला डकरे,जयश्री राजुरकर, सुनीता घिवे,कामिनी देशकर, सुनंदा सौदारी, राजमनी सौदारी,ज्योशना देवतळे व पुरुष उपस्थित संजय तिवारी,साजन गोहणे,मुन्ना लोडे, स्वप्नील वाढई,नवीन मोरे,मयुर कलवल, विशाल दामेर व आदी उपस्थित होते.