• आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दिल्लीत भाजपचे सरकार आल्याने जल्लोष
• फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाने साजरा केला
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
घुग्घुस: दि.८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोज आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन केल्याने मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी वातावरण केले.
या आनंदोत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला.फटाके फोडून,मिठाई वाटुन आणि गुलाल उधळुन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी “भारतीय जनता पक्ष जिंदाबाद” व किशोरभाऊ आगे बडो हम तुमारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला.
या जल्लोषात आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात माजी उपसरपंच संजय तिवारी,माजी सरपंच संतोष नुने,निरिक्षण तांड्रा
इमरान खान,नवीन मोरे,मुन्ना लोडे, अनिल कांबळे,स्वप्नील वाढई,मयुर कलवल,अरुण दामर,सुरज मोरपाका,गजानन उनमाले, विजय कपूर,नंदकिशोर यादव,सविता गोहणे,उषाताई आगदारी,उज्वला उईके,नितु जयस्वाल,ज्योती बावणे, वनिता निहाल आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाच्या आनंद साजरा केला.या सोहळ्यामुळे संपुर्ण घुग्घुस शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
