Home Breaking News • वडवणी शहरात माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

• वडवणी शहरात माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

198

• वडवणी शहरात माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुवर्ण भारत : गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी

वडवणी शहरात त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली . जयंतीनिमित्त वडवणी शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणुक काढण्यात आली असून , या प्रसंगी वडवणी शहरातील महिला ,मुली ,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर , रिपाई तालुका अध्यक्ष महादेव दादा उजगरे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे तालुका अध्यक्ष सतिष सोनवणे,सचिव महेश सदरे, पत्रकार सुधाकरराव पोटभरे. पत्रकार ओमप्रकाश साबळे. पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम. पत्रकार धम्मपाल डावरे. पत्रकार वाजेद पठाण. पत्रकार अतुल जाधव. पत्रकार हरी पवार. पत्रकार राम चौरे.सह अदी पत्रकारांनी माता रमाई जयंती निमित्त मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन पुष्पगुच्छ अर्पण करत अभिवादन केले .