Home Breaking News • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन व...

• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन व जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य व फळ वाटप

157

•  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस निमित्त सामाजिक उपक्रम घेऊन व  जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य व फळ वाटप

सुवर्ण भारत : गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील विद्यमान उपमुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी (ता. वडवणी) येथे शालेय साहित्य /फळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना मराठवाडा निरीक्षक व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून , समाजातील गोरगरीब , गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

       या प्रसंगी कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर, शिवसेना वैद्यकीय उपजिल्हाप्रमुख रूग्णसेवक शरद झोडगे, खडकी गावचे सरपंच अशोकभाऊ चोले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वडवणी तालुकाप्रमुख हरिदास करांडे यांची उपस्थिती लाभली असून , उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसुन आता असून नव्या वह्या, पेन, पेन्सिली तसेच फळे मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी या प्रसंगी समाधान व्यक्त केले .
          या ठिकाणी कार्यक्रमात गावातील सर्व स्तरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून , या वेळी जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्य.स.उपाध्यक्ष मधुकर चोले,शिक्षक गायकवाड सर, सानप मॅडम, जाधव सर, सावंत सर, वरपे सर यांच्यासह इतर शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करुन अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले .