#Beed आष्टी तालुक्यातील कडा येथील लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी बनविले रॉकेट मॉडेल–
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच आष्टी तालुक्यातील कडा येथील महावीर इंग्लिश स्कूल आणि इग्नाईटिंग ड्रीम्स ऑफ यंग माईंडस फाउंडेशन यांच्या सहकार्याने जी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत कार्य करत असून , मुलांमध्ये कौशल्य क्षमता विकसित करणे,मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे त्याचबरोबर मुलांमध्ये अवकाश विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या करिता शनिवार दिनाक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी एकदिवसीय अंतरीक्ष ज्ञान अभियान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी रविशंकर कुमार सर, रत्नेश सोनी सर आणि नवीन सर या इस्रो टीमच्या मार्गदर्शनाखाली अगरबत्ती बॉक्स, पोटॅशियम नायट्रेट, शुगर,चारकोल,पुठ्ठा,
चिकट टेप सह इतर वस्तूपासून रॉकेट तयार करून त्यांचे अवकाशात यशस्वी सामूहिक प्रक्षेपण करण्यात आले असून , .या कार्यशाळेमध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . या मध्ये एकूण २८ रॉकेट तयार करण्यात आले असून , या सर्व राँकेटने गगन भरारी घेतली . अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला असून , या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नव-नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला . या प्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी मोलाचे परीश्रम घेऊन हे राँकेट बनविले . जेव्हा हे राँकेट आकाशात उडत होते तेव्हा या विद्यार्थ्यांचा आनंद हि गगनाला भिडल्या सारखा दिसून आले . या आनंदाच्या क्षणांना उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने विद्यार्थ्यांच्या आनंदाला द्विगुणित केले होते . या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमितजी राठोड, उपाध्यक्ष संदिपजी चानोदिया, सचिव . हेमंतजी मेहेर, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोदजी भळगट,मनिषजी गांधी, प्रकाशजी श्रीमाळ, अमोलजी पटवा, संजयजी पितळे, संतोषजी गांधी सल्लागार . पी.जी. मेहेर सर, मुख्याध्यापक के.अभिलाष सर आदी जन उपस्थित होते . या कार्यक्रमाला कडा सह परिसरातील पालकवर्ग , शिक्षणप्रेमी , नागरिक उपस्थित होते .
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य करून यशस्वी रित्या हे कार्यक्रम पार पाडले .
