धावत्या गर्दीमध्ये, मनाचा दरवाजा खोल,
खूप उशीर झालाय, आतातरी स्वतःशी बोल
सुवर्ण भारत: मंगेश तिखट, प्रतिनीधी
होऊ दे मन हलकं, पाणी आले डोळ्यात जरी
जगात कुठेही नाही साथ कुणाची मायबापापरी
भविष्याचा विचार करता करता, जाईल तुझा तोल
खूप उशीर झालाय, आतातरी स्वतःशी बोल
बोलता बोलता स्वतःशी, प्रश्नांचा दरवाजा कर खुला
विचार प्रश्न स्वतःला, काय हवंय रे तुला
महागाईच्या जगात तु, जाणुन घे स्वतःचा मोल
खूप उशीर झालाय, आतातरी स्वतःशी बोल
जगाचा विचार करताना तुला, स्वतःच मन कसं कळेल
घे भरारी अशी की, आकाश ठेंगणं पडेल
विचार कर जरा, वाजण्याआधी ढोल
खूप उशीर झालाय, आतातरी स्वतःशी बोल
कवी-तनवी झाडे (B.SW 1st year)
मु. हरदोना ता. राजुरा जि. चंद्रपुर
