Home Breaking News #Beed शिरापूर येथील चैतन्य गोरक्षनाथ गडाच्या सभामंडप व उद्यान उभारण्यासाठी १ कोटी...

#Beed शिरापूर येथील चैतन्य गोरक्षनाथ गडाच्या सभामंडप व उद्यान उभारण्यासाठी १ कोटी निधी मागणी : लोकतुषार बोरुडे

164

#Beed शिरापूर येथील चैतन्य गोरक्षनाथ गडाच्या सभामंडप व उद्यान उभारण्यासाठी १ कोटी निधी मागणी : लोकतुषार बोरुडे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी 
8087175712

आष्टी तालुक्यातील मौजे शिरापूर येथील चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांचे अतिशय सुंदर निसर्ग रम्य वातावरणात मंदिर आहे . या ठिकाणी शिरापूर, टाकळी , सराडेवडगाव, आनंदवाडी, पिंपळगाव आदी परिसरातील भावीक/माता /भगिनीं भक्त गण दर्शनासाठी कायम येतात . या ठिकाणी सध्या नऊ दिवस भव्य अखंड हरिनाम -सप्ताह ,नवनाथ पारायण, चालु असून हजारो नाथ भक्त दर्शन , कीर्तनाचा महाभोजनाचा लाभ घेतात . या ठिकाणी भक्तासाठी, व किर्तन साठी एक भक्कम व चांगली सभामंडपाची गरज असल्याने या साठी निधी द्यावा , आसे मौजे शिरापुर गावचे भुमीपुत्र , युवा नेते तुषार बोरुडे यांनी ग़ाम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे .
पुढे सांगितले की गोरक्षनाथ गडावर उद्यान उभारल्याने एक मंदिराच्या परिसर सौंदर्यात नक्कीच भर पडून शोभा वाढून एक चांगल पर्यटनस्थळ म्हणून नावा रूपाला येईल . व या ठिकाणी होतकरु- तरूणांना छोटे छोटे व्यावसाय, रोजगार सुरू करण्याची संधी मिळेल . त्या मुळे या मागणी कडे ग्रामविकास मंत्री यांनी लक्ष देऊन मागणी पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व तसेच विविध संकल्पना उभारून उद्यान निर्मिती करावी जेणेकरून पंचक्रोशीतील भाविक भक्त ,नागरीकांचे मनोरंजन होउन मनाला विरंगुळा मिळेल .
. त्या मध्ये विविध माहिती प्रतिक्रुती व उद्यानातील बागे मध्ये विविध प्रकारची फुले, रोपे, व्रक्ष, खेळणी, काल्पनिक व वास्तविक यांची उभारणी करावी , जॉगिंग ट्रक, पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांसाठी प्राणायण व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध असावे . असा नागरी हिताच्या उपक्रमामुळे नागरिकांना स्वता:चे जिवनमय आनंदादायी राखण्यास उद्यानाची मोठ्या प्रमाणात निश्चित मदत होईल असे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात युवक नेते तुषार बोरुडे यांनी सांगितले आहे .