#chandrapur हिराई महोत्सवात सलाम किसान चे ड्रोन प्रात्यिक्षिक
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
चंद्रपुर : हिराई महोत्सव सरस मिनी उत्सवात सलाम किसान द्वारा कृषी ड्रोन उत्पादन प्रदर्शन आणि मृदा चाचणी किट प्रदर्शननाला शेतकऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीचे कौतुक केले.
पाच दिवस चालेल्या या प्रदर्शनीत सलाम किसानने एक लकी ड्रॉ स्कीम व प्रश्न मंजुषा स्पर्धा चालवली ज्यामध्ये भेट देणारे लोकाना मोफत भेटवस्तू देण्यात आली.विशेष म्हणजे सलाम किसान द्वारा भेटवस्तू प्रदर्शनीत लावलेल्या स्टालवरून खरेदी केल्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,एमएसआरएलएम चे प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे,डॉ. काश्मिरा संखे, सहाय्यक आयुक्त चंद्रपूर जिल्हा, आणि एमएआय डीसी चे प्रादेशिक प्रशासक विजय फल्ले,यांनी महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सलाम किसान स्टॉल आणि त्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतीचे कौतुक केले.याशिवाय एमएआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक आणि जिल्हा व परिसरातील कल्पक प्रगतीशील शेतकऱ्यांनीही या स्टॉलला भेट दिली.महोत्सवात नांदा फाटा येथील हरिओम यादव यांनी कल्पक आणि प्रगतीशील शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीद्वारे आपले अनुभव सांगितले व त्याचे फायदे सांगितले.याप्रसंगी सलाम किसान चे अक्षय खोबरागडे,विकास अधिकारी सुमित मुंगले, ड्रोन पायलट अमोल कोहरे आणि मुकेश नागदेवते आणि गिलबिली गावातील स्वयंसेवकांचा समावेश होता.
