• आष्टा ग्रामपंचायत येथे प्लास्टील निर्मुलन व महास्वच्छता अभियान.
सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी,भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायत व वनविभाग ताडोबाच्या संयुक्त रित्या मौजा आष्टा येथील आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ला प्लास्टिक निर्मूलन व महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियाना करीता विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर,रेड्डी उपवनसरक्षक चंद्रपूर, अनिकेत भांडारकर तहसीलदार भद्रावती, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पं. स. भद्रावती, प्रामुख्याने उपस्थित होते.
या अभियानात चिवंडे वनपरीक्षेत्र अधिकारी ताडोबा, सौ. प्रणाली भागवत विस्तार अधिकारी पं. स. भद्रावती, कामटकर वनपाल आष्टा, नन्नावरे वनपाल भानुसखिंडी, भरत राठोड ग्रामपंचायत अधिकारी आष्टा,हेमंत मेहेर ग्रामपंचायत अधिकारी, थुल SBM पं. स. भद्रावती सौ. पुरामशेट्टीवर SBM पं. स. भद्रावती,दडमल मंडळ अधिकारी मुधोली, सौ. टिपले तलाठी आष्टा,चांगदेव रोडे सरपंच ग्रामपंचायत आष्टा, सौ. सुरेखा अहिरकर उपसरपंच ग्रामपंचायत आष्टा, नंदकिशोर आत्राम सदस्य ग्रामपंचायत आष्टा,सुहास बहिरे पोलीस पाटील आष्टा, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, आष्टा गावातील नागरिक,शाळेतील विध्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यशस्वी रित्या पार पाडले.
