#Beed dist पखालीला इंजेक्शन भरपूर झालेत आतातर डायरेक्ट हाल्याला ढोस देऊन टाका— शेतकरी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष शेख अजिमोद्दीन
उप कार्यकारी अभियंता यांच्या कडे प्रतितास 50 रूपये नुकसानभरपाई चे अर्ज करावे—
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712
बीड जिल्ह्यातील आष्टी तालूक्यात महावितरण कंपनीत तूघलकी कारभार सुरू असून, राज्यकर्त्यांना याचे सोयरसुतक नसुन उलट राजाश्रय आहे कि काय हेच कळत नाही?
घरगूती विज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने चोवीस तास विज पुरवठा देणे बंधनकारक आहे . व तसेच कृषी पंपाना पूर्ण क्षमतेने आठ तास विज पुरवठा देणे बंधनकारक असून , मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 25 जूलै 2024 नूसार शासनाने राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाना पूर्णत: मोफत विज पूरवली जाईल याकरिता 14 हजार 760 कोटी रूपये महावितरण कंपनीला देण्यात आले आहेत , म्हणजेच शेतकऱ्यांनी आपले विज बील भरले. महाविरण कंपनीचे शेतकऱ्यांचे विज बील आज रोजी शून्य रूपये असून व या पूढेही शून्यच राहणार .
शेतकऱ्यांना शून्य वीज बील वाटपासाठी सबस्टेशन मध्ये विज बील आले होते , परंतु ते वाटप केले गेले नाही . ऑनलाईन आपला ग्राहक नंबर टाकून आपले शून्य विज बील प्रत काढता येते .
पिम्पळा सबस्टेशन मधून व तसेच तालुक्यातील जवळपास सर्वच सबस्टेशन मधून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा केला जात असून , पिंम्मळा सबस्टेशन मधून घरगुती विज पुरवठा सिंगल फेज बंद करण्यात आला . शेतीपंपाना अत्यंत कमी दाबाने व मनमानी पध्दतीने वेळेत बदल करत विज पुरवठा केला जात असून , सबस्टेशनमध्ये अधिकृत कर्मचारी हजरच राहत नाहीत . जिसकी लाठी ऊसकी भैंस अशी परिस्थिती असुन , सबस्टेशनचा अधिकृत मोबाईल नंबर बंद करून ठेवला असून , ज्यूनिअर अभियंता धानोरा व उप कार्यकारी अभियंता आष्टी हे सामान्य शेतकऱ्यांचे फोन अजिबात उचलत नाहीत . सदर अभियंते हे उंटावरून शेळ्या हाकत असुन , राजकिय नेते मंडळी मात्र याबाबत या अभियंत्यांना जाब विचारत नाहीत ? तरी आता निवेदन, आंदोलन करून पखालीला इंजेक्शन देण्याऐवजी शेतकऱ्यांनी आपले विज बील आता भरलेले आहे व आपण आता थकबाकीदार नसुन घरगूती विज ग्राहकांनी व शेतीपंपधारकांनी आता एकत्रित येऊन उप कार्यकारी अभियंता आष्टी यांचे कडे शेती पंपाना कमी दाबाने वीज पुरवठा केला व पूर्ण आठ तास विज पुरवठा केला नाही म्हणून विज कायदा2003 नूसार प्रति तास 50 रूपये या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी , म्हणून रितसर अर्ज दाखल करून पोहच घ्यावी . व त्याचप्रमाणे घरगूती विज ग्राहकांनी अत्यंत कमी दाबाने व 24 तास विज पुरवठा केला गेला नाही म्हणून आपला अर्ज उपकार्यकारी अभियंता कडे करा, व अर्जात आपला ग्राहक नंबर व मोबाईल नंबर टाकावा , विज वितरण कंपनीचे कर्मचारी तूमचे आकडे आहेत हे सांगताना दिसतात त्यांना घाबरून जाऊ नका , महावितरण कंपनीने आता सर्वं शेती पंपाचे विज कोटेशन भरून घेतले पाहिजे , जेणेकरून कंपनीला त्या शेतकऱ्यांचे शासनाकडून विज बील मिळेल व कंपनी अधिक नफ्यात येईल .
विज पूरवठा सूरळीत हवा असेल तर आता पखालीला इंजेक्शन देण्याऐवजी हल्यालाच ढोस देऊन मारले पाहिजे , शेती पंपधारक व घरगुती विज ग्राहक या सर्वांना विनंती आहे की आपण विजेच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांचेकडे प्रती तास 50 रूपये नूकसान भरपाई द्यावी , म्हणून रितसर अर्ज दाखल करून त्याची प्रत शेतकरी संघटनेकडे द्यावी , शेतकरी संघटना हे सर्व अर्ज घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा मानस असून , महावितरण कंपनीला कूणाचे अभय हे माहीत नाही ? तरी कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करून शेतकरी संघटनेकडे एकप्रत जमा करावी असे आव्हान शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी प्रसिद्ध दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे .
