ji#Chandrapur खैरगांव येथे तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर:- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालया अंतर्गत नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व स्वतंत्र युवा संस्था चांदसुर्ला (खैरगांव) च्या वतीने आयोजित दोन दिवसीय तालुका स्तरीय व एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन मा.अनिलभाऊ डोंगरे सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच विचोडा यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटक मा.देवराव ताजने जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच खैरगांव यांच्या हस्ते प्रमुख अतिथी मा.माधुरी सागोरे सरपंच विचोडा, प्रशांत भारती जिल्हाध्यक्ष इंटक युवा कांग्रेस,देवराव कोंडेकर विशेष कार्यकारी अधिकारी तथा श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर,आशिषभाऊ माशीरकर अध्यक्ष प्रवृत्ती फाउंडेशन,सुनिल दादा पाटील, ग्राम पंचायत सदस्य संगिता हेलवडे,अंकित ठेंगारे तसेच शिवा रायपुरे ,गुरुदास कातकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या तीन दिवसीय स्पर्धेत मुलं व मुलींकरिता कबड्डी,खो खो,गोळा फेक व १०० धावणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.याचे परीक्षण विविध परीक्षकांनी करून निकाल जाहीर केला तो खालीलप्रमाणे होता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलामध्ये प्रथम सिंनाळा टीम,द्वितीय खैरगांव टीम,तृतीय बेलोरा टीमने पटकाविला तर खो खो खेळात मुलींमध्ये प्रथम चंद्रपूर टीम व द्वितीय चिंचाळा टीमने पटकाविला व तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम अमोल राठोड,द्वितीय आझाद आसुटकर आणि जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम आझाद आसुटकर,द्वितीय आशिष आठमांडे तर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय गोळाफेक मुलींमध्ये प्रथम शितल गुरनुले, द्वितीय किरण दुर्गे तसेच तालुका व जिल्हास्तरीय १०० मीटर रनिंग स्पर्धा मुलांमध्ये प्रथम सुमित वाढई, द्वितीय अक्षय कंकलवार तर मुलींमध्ये प्रथम लिपी सोना ,द्वितीय सोनाली भंडारे यांनी पटकाविला होता दोन्हीही स्पर्धेत बक्षिस वितरण प्रशांत दुर्गे माजी अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर,राजेंद्र पोईनकर संगीत शिक्षक,देवराव कोंडेकर सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती,आशिष माशीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उत्तम आयोजक स्वतंत्र युवा संस्था खैरगांवचे अध्यक्ष प्रतिक मसराम,उपाध्यक्ष सुरज पारशिवे,सचिव उमेश लाखे,कोषाध्यक्ष शैलेश जाधव,सदस्य कुणाल क्षीरसागर, आयुष रायपुरे,आदी रायपुरे,कुणाल येसेकर, आदित्य गड्डलवार,अभिजित अलोने,उज्जला नेवारे,भाग्यश्री झोडे, सानिया टेकाम,सुमित पारशिवे,ओम परसुटकर,अजिंक्य मडावी,कुणाल अलोने,रंजित काकड,भाग्यवान झोडे, अभिजीत अलोने, रत्नाकर मेश्राम, दीक्षा वाघ, कीर्ती जोगी, पुनम वाढई, प्राची हेलवडे, श्रद्धा कन्नाके, प्रीतम रामटेके, काजल मसराम, साहिल धुर्वे, पवन, संजीवनी कन्नाके, स्वाती वेलादी, साहिल हेलवडे, छकुली क्षीरसागर, अविका क्षीरसागर, माही गौरकार, शितल कन्नाके, अंकिता जुगनाके, तनुजा जाधव, गुंजन जुगनाके, दामिनी खंडाते यांनी केले होते.
