Home Breaking News #Beed dist मानेवाडी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

#Beed dist मानेवाडी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

153

#Beeddist मानेवाडी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी–

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड तालुक्यातील मानेवाडी येथे राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून , दीप प्रज्वलन ल अभिवादन करण्यात आले .
या प्रसंगी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले असून ,
मानेवाडी येथील जेष्ठ समाजसेवक दिगंबर आवारे पाटील यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श चारित्र्याचा व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ व बौद्ध धर्म स्वीकारून
बुद्धमं शरनं गच्छामी.
धम्ममं शरनं गच्छामी.
संघम शरनं गच्छामी.
प्रज्ञा, सील, करुणा, अशा पंचशील पूजा पाठ संपन्न करून मनुष्य जातीने किंवा धर्माने श्रेष्ठ ठरत नसतो तो कर्तव्याने श्रेष्ठ ठरतो, हे डॉ.आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनाचा इतिहास मांडून शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . या प्रसंगी उपस्थित संस्थेच्या सदस्या व महिला जनाबाई मोरे, भागीत्रा मोरे,अनिता माने, सुदामती मोरे, साखरबाई शिरसाट, सुनिता माने, कोमल माने, उषा जगताप, रत्नमाला माने, भिमाबाई गाडे, सारिका मोरे, उषाबाई आवारे, कुशावृता इंगोले, मंगल शिंदे, सुखमल मोरे, सोजर शिंदे, मालन माने, कमलताई माने, मुद्रका लगाडे, चंद्रकांत खवले,किशोर जगताप, दिगंबर मोरे,भानुदास माने,अनिल अहिरे,तानाजी मोरे,रमेश माने, विजय मुळे यांच्यासह मानेवाडी येथील महीला भगिणी मोठया संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आभार अविनाश माने यांनी मांनले .