Home Breaking News #Beed dist भाजपा परिवारात महाराष्ट्रातून 1 कोटी सदस्यांची भर • भाजपच्या प्राथमिक...

#Beed dist भाजपा परिवारात महाराष्ट्रातून 1 कोटी सदस्यांची भर • भाजपच्या प्राथमिक सदस्य अभियानाची बीड जिल्ह्यात गगन भरारी 1 लाख साठ हजार :शंकर देशमुख

170

#Beed dist भाजपा परिवारात महाराष्ट्रातून 1 कोटी सदस्यांची भर
• भाजपच्या प्राथमिक सदस्य अभियानाची बीड जिल्ह्यात गगन भरारी 1 लाख साठ हजार :शंकर देशमुख

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्व भाजपा परिवारात महाराष्ट्रातून १ कोटी सदस्यांची भर झाली असुन , लोकनेत्या ना.पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शना खाली बीड जिल्ह्यात 1 लाख साठ हजार भाजप सदस्य नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे .
पुढे सांगितले की , भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात संघटन पर्व सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे नेतृत्वात भाजप सदस्य नोंदणी अभियान 1 जानेवारी पासुन सुरु असुन आज महाराष्ट्रात 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली . बीड जिल्ह्यात लोकनेत्या पंकजा मुंडे,.खा.प्रितम मुंडे,आ.सुरेश आण्णा धस , आ.नमिता मुंदडा यांचे नेतृत्वाखाली हे अभियान सुरु असून, बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मिळुन दि 9 फेब्रुवारी पर्यंत एकूण 160057 भाजप सदस्य नोंदणी झाली .
गेवराई विधानसभा 13020, माजलगाव विधानसभा 18667 , बीड विधानसभा 22151 , आष्टी विधानसभा 46200 , केज विधानसभा 39857 , परळी विधानसभा 20162 भाजप सदस्य नोंदणी झाली .
या अभियानाचे जिल्हा संयोजक नवनाथ शिराळे , जिल्हाभरातील प्रदेश पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष , शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, युवा मोर्चा महिला मोर्चा सोशल मिडीया विस्तारक, दलित आघाडी – भटके विमुक्त आघाडी ,कामगार मोर्चा सर्व स्तरातील कार्यकर्ते यांनी या नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन नोंदणी केली . सहा विधानसभा मतदार संघात अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी वैयक्तिक 1000 सदस्य नोंदणी केली .यात प्रामुख्याने ना.पंकजा मुंडे ,माजी खा.प्रितम मुंडे, आ.नमिता मुंदडा ,नंदकुमार मुंदडा, अदित्य सारडा ,शंकर देशमुख ,अशोक लोढा ,प्रशांत पाटील ,सुरेश हात्ते ,भुषण पवार , अरुण राऊत, सतिष मुंडे, पवन मुंडे ,डॅा अशोक तिडके ,भागवत येवले ,ज्ञानेश्वर मुंडेसह अशा अनेकांनी केली .
दि.19 फेब्रुवारी पर्यंत हे नोंदणी अभियान सुरु असून लवकरच बीड जिल्हा 2 लाख सदस्य पार करेल असा विश्वास व्यक्त करुन प्रत्येक बुथवर 5 सक्रिय सदस्य नोंदणी जिल्ह्यात करण्या येणार आहे ,तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे या नोंदणी बद्दल ना.पंकजा मुंडे ,आ.सुरेश धस आ.नमिता मुंदडा यांनी अभिनंदन केले असल्याचे प्रसिद्ध दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले आहे .