Home Breaking News #Beed dist चौसाळा येथे ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचा भव्य शुभारंभ—

#Beed dist चौसाळा येथे ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचा भव्य शुभारंभ—

248

#Beed dist चौसाळा येथे ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचा भव्य शुभारंभ—

सुवर्ण भारत : गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712

चौसाळा व परिसरातील ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित , इंग्रजी ,विज्ञान व नवोदय स्कॉलरशिप एनटीएस, एन एम एम एस ,अशा विविध स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन अनुभवी व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्याच्या हेतूने ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला .
हा कार्यक्रम माजी वैद्यकीय अधिकारी डॉअंकुशरावजी मंचुके यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर येडे साहेब व डॉक्टर मोठे जोशना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर ,ज्येष्ठ शिक्षक केदार सर , जाडकर सर. संभाजी आबा जोगदंड, वैद्य सर, घोडके सर , मोटे सर, लिमकर सर, उमेश रावजी जोगदंड , अभियंता पोपटरावजी जोगदंड साहेब, पार्थ फाईंडर कोचिंग क्लासेसचे संचालक राऊत सर. बहुसंख्येने विद्यार्थी , पालक आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रथम मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर अंकुशरावजी मांचुके यांनी फित कापून ज्ञानदीप क्लासेस चे उद्घाटन केले . सर्व मान्यवरांचे क्लासेस संचालक रवींद्र गुरव सर. संचालक लाखे सर , जाधव सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचाशाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक रवींद्र गुरव सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान देऊन स्पर्धेच्या युगामध्ये सक्षम बनवले जाईल अशा प्रकारची ग्वाही उपस्थित पालक वर्गास दिली .
गेवराई क्लासेसचे संचालक प्रल्हाद खेत्रे यांनी पालक वर्गाला विनंती करताना विद्यार्थ्यांना मोबाईल व प्रसारमाध्यमांच्या प्रलोभना पासून दूर ठेवा आणि आपणही आपल्या पाल्याच्या बाबतीत सतर्क रहा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली . कानडी घाट हायस्कूल कानडी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जाडकर सर यांनी ज्ञानदीप क्लासेस प्रगती व यशाच्या शिखरावर पोहोचेल शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अंकुशराव जी मंचूके यांनी विचार व्यक्त करताना ज्ञानदीप क्लासेस च्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या कल्याणासाठी ही सर्व शिक्षक मंडळी कष्ट घेतील व पालकांचे समाधान विश्वास संपादन करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली . गुरुदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर यांनी शुभेच्छा देताना उत्तुंग आपल्या भरारी पुढे गगन ठेंगणे भासावे l कवेत अंबर घेताना अवघे विश्व विसावे l l असे मानस व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी करून सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे आभार ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक श्री रविंद्र गुरव सर यांचे मार्गदर्शक व गुरुदत्त विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री केदार सर यांनी मानले .