Home Breaking News #Beed dist  शिवजयंती निमित्त समाजसेवक सुरेश पाटलांचा अमळनेर जिल्हा परिषद गटात दौरा—

#Beed dist  शिवजयंती निमित्त समाजसेवक सुरेश पाटलांचा अमळनेर जिल्हा परिषद गटात दौरा—

129

#Beed dist  शिवजयंती निमित्त समाजसेवक सुरेश पाटलांचा अमळनेर जिल्हा परिषद गटात दौरा—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी 
8087175712

अखंड भारताचे आराध्य दैवत तथा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांचा अंमळनेर जिल्हा परिषद गटात दौरा असून अनेक गावात शिवजयंती निमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत .
मल्हारी मार्तंड खंडेरायाचे तीर्थक्षेत्र असलेले आदर्श गाव कुसळंब येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत . तसेच शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद अंमळनेर गटासह अनेक गावात सहभागी होणार आहेत . तसेच अंमळनेर गटातील सर्व गावातील नागरिकांशी संपर्क साधून विविध सामाजिक, राजकीय विषयावर चर्चा करणार आहेत , तरी सर्व अंमळनेर गटातील शिवमावळे व शिव संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होवून सर्व जाती धर्मांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन शिव संघर्ष ग्रुपचे मावळे व समाजसेवक सुरेश पाटील मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे .