Home Breaking News #Chandrapur चंद्रपूर -छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न ! • मॅरेथॉनचे आयोजन! •पोलिस...

#Chandrapur चंद्रपूर -छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न ! • मॅरेथॉनचे आयोजन! •पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दाखवली रॅलीला हिरवी झेंडी !

142

#Chandrapur चंद्रपूर -छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न !
• मॅरेथॉनचे आयोजन!
•पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दाखवली रॅलीला हिरवी झेंडी !

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर:छत्रपती महोत्सव 2025 चे उद्घाटन चंद्रपूरातील गांधी चौक येथे छत्रपती मॅरेथॉनने थाटात संपन्न झाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील स्पर्धंकानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला . या वेळी
सर्वं स्पर्धकांत चैतन्यपूर्ण उत्साह होता .शिवरायाच्या घोषणाने वातावरण दुमदुमले होते. पारितोषिक विजेते गट 1 पुरुष वय 8 ते 14वर्ष प्रथम रोशन ठाकरे, द्वितीय कृष्णा पारखी, तृतीय ,कुशल कामडे गट 2 पुरुष खुला प्रथम भूषण आस्वले द्वितीय रितिक धोडरे तृतीय, पियुष गायधनी गट 1 महिला वय 8 ते 14 वर्ष प्रथम सखी दोरखंडे द्वितीय श्रेया येवले
तृतीय तेजस्वी ठाकरे गट 2 महिला खुला प्रथम रुचिका नागरकर द्वितीय साक्षी पेलेजवार
तृतीय लावण्या नागरकर यांनी क्रमांक प्राप्त केले .तर लक्ष्मी पुंगाटी हिने प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त केले .सर्व विजेते व सहभागी यांनी 20 फेब्रुवारीला भव्य कार्यक्रमात पारितोषिक दिले जाणार आहे. यावेळी छत्रपती महोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर कार्याध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी,सचिव हरीश ससनकर, उपाध्यक्ष राजीव कक्कड, सहसचिव बंडू धोत्रे, सोहेल शेख, कोषाध्यक्ष प्रा निलेश बेलखेडे सहकोषाध्यक्ष प्रा. वैशाली तुमराम प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खनके, नंदुभाऊ नागरकर, विजय टोंगे कार्यकारी सदस्य चंद्रकांत वैद्य, राजेंद्र खांडेकर, दिलीप रिंगणे, निमेश मानकर, दीपक जेऊरकर, निशिकांत देशमुख, दिलीप होरे, विनोद थेरे, प्रा .कमलकार धानोरकर, पायल अन्नदेलवार आदिं उपस्थित होते. संचालन हरीश ससनकर यांनी केले तर प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा.निलेश बेलखेडे यांनी मानले .मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी विजय बोरकर, जितेंद्र पिंपलशेंडे, मुकेश तेलतुंबडे, गोविंद पवार, आदर्श नावेद व कृष्णा, रोशन बुजाडे विजय भगत रामा फड यांनी विशेष सहकार्य केले.