Home Breaking News भरगच्च कार्यक्रमात होतोय महिला दिन साजरा सुवर्णा लोखंडेचा पुढाकार!

भरगच्च कार्यक्रमात होतोय महिला दिन साजरा सुवर्णा लोखंडेचा पुढाकार!

97

भरगच्च कार्यक्रमात होतोय महिला दिन साजरा सुवर्णा लोखंडेचा पुढाकार!

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर:सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या शहरातील तुकुम परिसरातील स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला शारदा मंडळाच्या वतीने येत्या 8 मार्चला आक्केवार वाडी निर्माण नगर येथे भव्य महिला दिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती उपरोक्त मंडळाच्या अध्यक्ष सुवर्णा लोखंडे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या दिनानिमित्त भव्य आनंद मेळावा,स्टाॅल सजावट, स्पर्धा,देश भक्तीपर गृप भजन संमेलन,व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने एका पत्रकातून करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा लोखंडे सह अन्य महिला पदाधिकारीअथक परिश्रम घेत आहेत.