#Bhadravti येत्या 21 फेब्रुवारीला मुक्ता नरेंद्र दाभोलकर भद्रावती नगरीत !
सुवर्ण भारत:किरण साळवी, प्रतिनीधी
भद्रावती:सामाजिक चळवळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक व प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर ह्या सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्या येत्या 21 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती नगरीत येत आहे
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्या सकाळी 10 वाजता भेट देतील.
सकाळी 11 वाजता राजमनी गार्डन व सभागृह रेल्वे स्टेशन रोड गवराळा भद्रावती येथे उपस्थित राहून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी त्या सामाजिक चळवळीतील विविध विषय संदर्भात संवाद करतील.
दुपारी अडीच वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहतील. व पत्रकारांसोबत संवाद साधतील .
पाच वाजता त्या मूलकडे प्रयान करतील.सोबतच कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थिती राहतील अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
