श्री.संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त प्रा.सुनिल गेडाम याच्या घरी महाप्रसादाचे आयोजन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
२० फेब्रुवारी २०२५ गुरूवार रोजी दरवर्षीप्रमाणे श्री.संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रा.वणी येथील साईबाबा नगर प्रा.सुनिल गेडाम यांचा घरी श्री.संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सामुहिक पुजा करण्यात आले.
प्रा.सुनिल गेडाम भक्तांना सांगत होते, की शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री.दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखलं जातं, अक्कलकोटनिवासी श्री.स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साई बाबा ही श्री दत्तांची पहिली दोन रुपं म्हमून ओळखली जातात.
गजानन महाराजांशी अनेक चमत्कारिक घटना आणि कथा निगडित आहेत. गजानन महाराजांचा भक्तांचा विश्वास होता, महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती आहे अनेक गजानन महाराज हे त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीमुळे आजारी लोकांना बरे करत असतात, जे लोक दुःखी असतील त्यांचे दुःख कमी करू शकतात आणि समस्यांचे निराकरण करून त्यांना सुखी आयुष्य देतात.
गजानन महाराजांची शिकवण सोपी होती. त्यांनी श्रद्धा, भक्ती, निस्वार्थीपणा आणि मानवतेची सेवा करण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले, महाराजांनी शिकवले की खरे अध्यात्म हे सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेम आणि करुणेने भरलेले नीतिमान आणि सद्गुणी जीवन जगण्यात आहे.
जरी गजानन महाराज एका छोट्या गावात राहत असले, तरी त्यांची शिकवण आणि प्रभाव सर्व दूरवर पसरला, भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून. जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता सर्व स्तरातील लोक त्यांच्या प्रेम आणि अध्यात्माच्या संदेशाकडे आकर्षित झाले.
तसेच शेकडोच्या वर भावी भक्तांनी महाप्रसादाचे लाभ घेण्यास आले.
याप्रसंगी सौ.मनिषा सुनिल गेडाम,कल्पना आत्राम,पुष्पा रामटेके, शितल आत्राम,मसराम व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.
