भद्रावतीच्या नवनियुक्त ठाणेदार वाढीवे मॅडम यांचे शिवसेना भद्रावती पदाधिकारी यांनी केले स्वागत
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : भद्रावतीच्या नवनियुक्त ठाणेदार लता वाढीवे मॅडम यांचे शिवसेना शिंदे गटा तर्फे भद्रावती शहरात आगमना प्रीत्यर्थ स्वागत करण्यात आले. यावेळी भद्रावती तालुक्यातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आले. वाढीवे मॅडम यांनी शिवसेना पदाधिकारी यांना चांगल्या कामा साठी सहकार्य करू असा शब्द दिला. यावेळी आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर,कमलकांत कडसकर शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती, प्रफुल्ल सारवण शिवसेना शहर प्रमुख भद्रावती, सुरज भैय्या शहा, सुमित हस्तक, मनीष बुच्चे उपशहर प्रमुख भद्रावती, आकाश वानखेडे उपशहर प्रमुख भद्रावती व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
