Home Breaking News • महाशिवरात्री निमित्त अनेकांनी घेतले भूतेश्वर महादेव मंदीराचे दर्शन! • रमेशजी...

• महाशिवरात्री निमित्त अनेकांनी घेतले भूतेश्वर महादेव मंदीराचे दर्शन! • रमेशजी ददगाल व मायाताई कोसरे यांनी सांगितला भूतेश्वर मंदिराचा इतिहास!

173

• महाशिवरात्री निमित्त अनेकांनी घेतले भूतेश्वर महादेव मंदीराचे दर्शन!

• रमेशजी ददगाल व मायाताई कोसरे यांनी सांगितला भूतेश्वर मंदिराचा इतिहास!

सुवर्ण भारत:किरण साळवी, प्रतिनीधी

मूल:आज महाशिवरात्री निमित्त भाविकांनी सकाळी मूल चंद्रपूर मार्गावरील भूतेश्वर महादेव मंदीराचे भक्ती भावाने व मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
दरम्यान नागपूरच्या समाजसेविका योगशिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व पंतजली योग समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघाचे कार्याध्यक्ष व ब्रिलीयंट ॲकाडमी स्कूलचे अध्यक्ष रमेश ददगाल यांनी याच मंदीरात मोठ्या श्रद्धेने पुजा अर्चना केली.तदवतंच त्यांनी मंदीरात भेटी दरम्यान या प्रतिनिधीशी बोलताना सदरहु मंदीराचा इतिहास सांगितला.
या वेळी लोकहित मूलचे दत्तात्रय समर्थ, चंद्रपूरचे राजू बघेल ,सुधा बघेल , जानाळ्याचे जनार्धन कुळमेथे, सविता कुळमेथे,वर्षा वसाके गुरुदास वसाके ,वर्षा कारंगेवार व इतर भक्तगण उपस्थित होते.