वरोरा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस
वरोर : शहरातील नेहरू चौक,गांधी चौक,आंबेडकर चौकात पिसाळलेल्या कुत्र्याने १३ लोकांना चावा घेऊन हैदोस घातला आहे.सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारादाखल दाखल केले आहे.
आज महाशिवरात्री उत्सव असून बाजारामध्ये लोकांची गर्दी वाढली .यातच पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आणि १३ लोकांना चावा घेऊन जखमी केले.त्यामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयभीत झाले आहे.जखमींमध्ये योगेश शेंडे वय २५,वरोरा,शबनम शेख वय ४२वरोरा,तृप्ती नगराळे वय १३ वरोरा,हर्ष कोपाड वय २४ वरोरा,गणपत वैद्य वय६७ कळमगाव,श्रेयस खडसे वय १२ वरोरा,माधुरी पोटे वय ३४ वरोरा,किशोर उत्तरवार वय ५० वरोरा,प्रमोद नांदे वय ५० वरोरा,समर्थ शंभरकर वय २१ वरोरा,शंकर धाबेकर वय ६५वरोरा,गणेश तांदुळकर वय ३१चंदनखेडा,संगीता सोनटक्के वय ३१ वरोरा या सर्व पीडित जखमी लोकांवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे.
शहरात असणारे मोकाट जनावरे रहदारीचे रस्त्यांवर ठान मांडून नसल्यामुळे रहदारीमध्ये अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.तसेच मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून ज्या कुत्र्यांना जखमा होतात त्यांचेवर वेळीच उपचार न झाल्याने ते पिसाळतात त्यामुळे ते कुणालाही चावा घेऊन जखमी करतात.त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त वेळीच नगरपरिषदेने करावा अशी मागणी होत आहे.
रेबीज चे इंजेक्शन दिले परंतु हिम्यूनोगलोबिन रॉबीन इंजेक्शन नव्हते.शरीरातील अँटी व्हायरस निघून जातात. शरीरात जिवाणू गेले तर : डॉ.रोहन पडोडे
