लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुस द्वारा चष्मे वितरण कार्यक्रम.
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
पांढरकवडा: जिल्हा आरोग्य यंत्रणा चंद्रपूर व लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा ग्रामपंचायत मध्ये नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते त्यात ज्या व्यक्तींना चष्माची गरज होती त्यांच्या करिता चष्मे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याकार्यक्रमाला गावचे माजी.सरपंच सुरज तोतडे, लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दीपक साळवे,श्रावण पिंपळकर,केशव मांदाळे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गावातील गरजू नागरिकांना दृष्टीदोष निवारण आणि चांगले आरोग्य प्रदान करणे हा होता. अनेकदा दृष्टीदोष असूनही आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांना चष्मे घेणे शक्य नसते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असते आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. चष्मे मिळाल्याने अनेक नागरिकांना दृष्टीदोषामुळे होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होतील. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा झाला आहे. दृष्टी सुधारल्याने त्यांची कामे अधिक सुलभ होतील. कार्यक्रमादरम्यान १३० नागरिकांना चष्मे वितरित करण्यात आले.
लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन नेहमीच समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असते. आरोग्य, शिक्षण, आणि इतर सामाजिक क्षेत्रातही फाउंडेशनने अनेक उपक्रम राबवले आहेत. या चष्मे वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी दर्शवली आहे.
कार्यक्रमाचे संचालन अनुराग मत्ते व आभार श्रीरंग पोतराजे यांनी मानले. पांढरकवडा ग्रामपंचायतीने देखील या कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. सरपंच तोतडे यांनी लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि गावकऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवणार आहे, ज्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल कौरासे,प्रिया पिंपळकर,मंजुषा वडस्कर यांनी अथक प्रयत्न केले.