Home Breaking News • तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात साजरा! •...

• तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात साजरा! • वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन! • माजी नगरसेवक दिपक जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची शिबीराला उपस्थीती!

17

• तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात साजरा!
• वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन!

• माजी नगरसेवक दिपक जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची शिबीराला उपस्थीती!

सुवर्ण भारत: किरण साळवी प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांचा आज वाढदिवस थाटात साजरा झाला.
दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने देवतळे मित्र परिवाराच्या वतीने चंद्रपूर शहराच्या बालाजी वार्डातील हनुमान मंदिरात एका महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदरहु नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते तथा मनपाचे माजी नगरसेवक दिपक जयस्वाल यांच्यासह माजी नगरसेवक अरुण बुरडकर , मुन्ना बुरडकर, बिंदू बडकेलवार,धन्ना येरेवार ,अरुण गर्लेगवार,सुरेश थोरात,वसंता पवार, सुनिता चिकाडे, सुहास पिंगे , परब गिरडकर यांची उपस्थिती लाभली होती. आयोजित शिबीराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामाजिक कार्यात नेहमीच राहुल देवतळे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या.