शिवसेनेच्या वतीने चंदणखेडा ग्रामपंचायतीस नवा सरपंच देण्याची मागणी, भद्रावती तहसीलदार यांना निवेदन
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील मौजा चंदणखेडा येथील ग्रामपंचायत सरपंच नयन जांभुळे हे सतत दारूच्या नशेत असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेल्या वर्षभरापासून ते व्यसनमुक्ती केंद्रात असल्याने ग्रामपंचायत प्रशासन रामभरोसे आहे. परिणामी, गावातील नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून ग्रामपंचायतीस सक्षम नेतृत्व मिळावे, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात व भद्रावती उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे शिवसैनिक सुरज शाहा यांनी भद्रावती तहसीलदार यांना निवेदन सादर केले आरोप लावणे. त्यांनी सरपंच नयन जांभुळे यांच्यावर तातडीने कार्यवाही करून नव्या सरपंचाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांमध्ये सरपंचांच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी असून, गावाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची नितांत आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक सुरज शाहा,शिवसेना भद्रावती उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक सुमित हस्तक व संपूर्ण गावकरी उपस्थित होते.