• वणी येथे नाभिक समाज मेळावा संपन्न..
• १६८ उपवर – वधू यांनी आपली नोंदणी करून परीचय दिला.
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती.
वणी : वणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणीच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा एक मार्च २०२५ ला शेतकरी मंदिर येथे संपन्न झाला. या मेळाव्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम १६८ उपवर वधू यांनी आपला परिचय देण्यात आला नाभिक समाजाती उत्कृष्ठ समाजकार्य व पत्रकार यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण दळे उद्घघाटक राजेंद्र नागतुरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प हार घालुन दिपप्रज्वलन केले. यात निवृत्ती पिस्तुलकर सचिन नक्षिणे, दिपक एकवनकर व इतर मान्यवर यांच्या उपस्थीतीत पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घघाटन राजेंद्र नागतुरे शाळा संस्थापक राळेगाव, यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष यांच्यातील निवड व नियुक्ती करून मानसन्मान करून त्यांना कामासाठी सज्ज केले. तालुका अध्यक्ष पुसद गोपाल जाधव, तालुकाध्यक्ष महागाव प्रवीण काळे, तालुका अध्यक्ष पांढरकवडा कैलास फुलभोगे, तालुकाध्यक्ष वणी विनोद धाबेकर, तालुका सलून अध्यक्ष वनी चंद्रकांत नक्षीने तालुकाध्यक्ष नेर आपले मार्गदर्शक विलास माहुलकर उमरखेडचे दुकानदार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गंगात्रे सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मंचावर उपस्थित मान्यवर कल्याण दळे महराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष, राजेंद्र नागतुरे, तारेनद्र बोर्डे, संजय खाडे, निवृती पिस्तुलकर, सौ. सरोजताई चांदेकर, सौ. शोभाताई नक्षिणे, शेखर वानखेडे,पुंडलीक कुबडे, अभय नागतुरे, शाम राजुरकर, सचिन नक्षिणे, प्रकाश सूर्वे, विलास काळे, देवा वाटेकर, नगाजी निबांळकर,अरुण घोडसाळ, दिनेश एकवनकर, नितीन नागमोते, रवि निलगींटवार, राजु




निंबाळकर, होते.
या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शशिकांत उर्फ डुडडू नक्षीने अभय नागतुरे निखिल मांडवकर तेजस नक्षीने चंद्रकांत नक्षिणे प्रजवल नागतुरे जितेंद्र घुमे विनोद धाबेकर प्रशांत नक्षीने अजय डांडे मनोज चौधरी भालचंद्र मांडवकर सुभाष तेजे बाळु कडुकर आयोजक दिलीप वनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक दिलिप वनकर, सुत्र संचालन सौ. सरोजताई चांदेकर यांनी तर उपस्थितांचे आभार डुड्ड नक्षिणे यांनी मानले.