

सहज सुचलं एक चांगला महिला व्हाॅट्सअप गृप- जयश्री मंगरूळकर
सुवर्ण भारत:प्रियंका गायकवाड,प्रतिनिधी
चंद्रपूर: सहज सुचलं एक चांगला महिला व्हाॅट्सअप गृप असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील राजूरा येथील मधुर व गोड आवाजाची गायिका जयश्री मंगरूळकर यांनी आज संध्याकाळी दिली.
या महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे व जेष्ठ समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या कडून मला या पुढे बरेच मार्गदर्शन मिळणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
संगित व गायनाची अमाप आवड असणाऱ्या जयश्री ह्या उच्च शिक्षित असून भविष्यात त्यांच्यावर सहज सुचलंच्या एखाद्या ग्रुपची जबाबदारी आल्यास त्या समर्थपणे सांभाळू शकतात असे स्पष्ट मत मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, मार्गदर्शिका साधना धकाते ,शैला चिमड्यालवार ,रजनी रणदिवे, काव्यकुंजच्या संयोजिका विद्या पिंजरकर, सहसंयोजिका अपर्णा चिडे , प्रविणा वाघाडे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.
जयश्री ह्या उत्तम गायिका असून अनेकदा त्यांनी विविध कार्यक्रमांतून गायिले आहे.त्या महाराष्ट्रातील सहज सुचलंच्या एक सदस्य आहेत.
