#Bhadravti
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खुन केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करा -मुलीच्या आई वडीलांची मागणी !
सूवर्ण भारत ✍️ राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी ,भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील चोरा येथील शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर घडलेला प्रसंग अतिशय संतापजनक असून या प्रकरणात आरोपी नऊ असताना फक्त एकाच व्यक्तीवर गुनाह दाखल करण्यात आला. लैगीक अपराधाचा व पास्कोचा गुन्हा का दर्ज केला अन्य ८ आरोपीवर आजपर्यंत कारवाई का केली नाही. अत्याचार करुन खुन केल्या प्रकरणात ९ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.
या बाबतीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ पोलीस अधिका-यांना निवेदने देण्यात आली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी रेटून धरली आहे.


