Home Breaking News #Ballarshah • भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसा निमित्त ७ एप्रिल...

#Ballarshah • भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसा निमित्त ७ एप्रिल ला रक्तदान शिबिर चे आयोजन

187

#Ballarshah
• भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसा निमित्त ७ एप्रिल ला रक्तदान शिबिर चे आयोजन

सुवर्ण भारत: विशाल डुंबरे प्रतिनीधी, चंद्रपूर

बल्लारपूर :भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष वनविभाग महामंडळ चंदनसिंग चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसा निमित्त रक्तदान सेवा समिती बल्लारपूर तर्फे सोमवार ७ एप्रिल रोजी एकदंत लॉन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. सरकारी रुग्णालये आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध नाही. जिल्ह्यात रक्ताची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती पाहता दरवर्षी चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे .