Home Breaking News ⬜‼️ काव्यरचना ‼️⬜

⬜‼️ काव्यरचना ‼️⬜

205

⬜‼️ काव्यरचना ‼️⬜

भीमा तुझ्या जन्मामुळे

भीमा तुझ्या जन्मामुळे
झाला दलितांचा उद्धार
लिहून भारतीय संविधान
दिला समानतेचा अधिकार //१//

राज्यघटनेचा तू रचिता
भारताचा शिल्पकार
अगाध ज्ञानाच्या बळावर
केलेस स्वप्न तू साकार //२//

बुरसटलेल्या समाजाला
दिली तुम्ही नवी दिशा
जागवून स्वाभिमान
प्रफुल्लित केली आशा //३//

पेटवून ज्ञानाचा दिवा
अंधःकार दूर सारला
प्रज्ञा,शील, करुणेचा
सुगंध तुम्ही पसरविला //४//

भीमाच्या संविधानाने
जन्म सार्थकी लागला
विसरून मतभेद सारे
लाभ सर्वांना मिळाला //५//

🟧⏸️कु.मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज गृप सदस्य
⬜⬜⬜⬜ठाणे⬜⬜⬜⬜