Home Breaking News #Ghugus • बाबासाहेबांची जयंती म्हणजेच प्रेरणा, परिवर्तन, आणि आत्मपरीक्षणाचा दिवस : दिप्ती...

#Ghugus • बाबासाहेबांची जयंती म्हणजेच प्रेरणा, परिवर्तन, आणि आत्मपरीक्षणाचा दिवस : दिप्ती सोनटक्के • काँग्रेस शहर काँग्रेस कार्यलयात बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी

94

#Ghugus
• बाबासाहेबांची जयंती म्हणजेच प्रेरणा, परिवर्तन, आणि आत्मपरीक्षणाचा दिवस : दिप्ती सोनटक्के

• काँग्रेस शहर काँग्रेस कार्यलयात बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

घुग्घूस : न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम म्हणजेच विश्व् रत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराने कोट्यावधी लोकांचे जीवन उजळले त्यांचे विचार हे अन्याया विरोधात लढण्याचे बळ देत असते आज 14 एप्रिल ही महामानवाची 135 वी जयंती घुग्घूस शहर काँग्रेस कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनात महिला नेत्या दिप्तीताई सोनटक्के व काँग्रेस महासचिव अलीम शेख, सुनील पाटील यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पेढे वाटून बाबासाहेब अमर रहेच्या जयघोष देत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर,बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, नुरूल सिद्दीकी,अभिषेक सपडी,अरविंद चहांदे, कपिल गोगला, शहंशाह शेख, आयुष आवळे, मनोज चांदेकर, साहिल आवळे, अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.