#Ghugus
आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.१४ एप्रिल २०२५ सोमवार रोजी महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोटी,कोटी नमम करण्यात आले.तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप नेते आशिष माशिरकर आपल्या मनोगत व्यक्त केली की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील बौद्ध विहारात सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच बरेच विहारात ज्ञान स्पर्धा, प्रबोधन संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. सायंकाळी सर्व धर्म समभाव समाज मिरवणूक काढण्यात येत आहे. सर्व मिळुन कार्यक्रम उत्साहात प.पु. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी,कोटी शांतिपूर्वक नमन करण्यात आले.
जेष्ठ नेते भाजपा उत्तर भारतीय मोर्चा यवतमाल जिल्हा प्रभारी संजय तिवारी आपल्या मार्गदर्शनात म्हणटले की,ज्ञानमुर्ती डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर यांनी तीन मंत्र दिले आहेत – शिक्षित बना, संघर्ष करा आणि संघटित रहा. देशभरात १४ एप्रिलचा दिवस विश्वरत्न आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब बी.आर.आंबेडकरांनी केवळ भारतास राज्यघटना देऊन महान लोकशाहीचा पाया घातला नाही तर देशातील कोटी दलित आणि वंचितांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला. डॉ.बी.आर आंबेडकर हे एक प्रसिद्ध राजकीय नेते,तत्वज्ञानी, लेखक,अर्थशास्त्रज्ञ,न्यायाधीश, बहु-भाषांतर,धर्म तत्वज्ञानाचे विद्वान आणि एक सामाजिक सुधारक होते ज्यांनी आपले जीवन भारतात अस्पृश्यता आणि सामाजिक असमानतेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले. त्यांचा असा विश्वास होता की अस्पृश्यता दूर केल्याशिवाय राष्ट्र प्रगती करू शकत नाही. तो भारतात दलित आणि मागासवर्गीयांचा मशीहा होता. दलित आणि मागासलेले लोक त्याला बाबसाहेब म्हणत असत. भारताच्या घटनेत बाबासाहेबने सर्वात महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याला घटनेचे वडील देखील म्हणतात.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता भाजप नेते,आशिष माशिरकर, संजय तिवारी,निरीक्षण तांड्रा,माजी.सरपंच संतोष नुने,नितु चौधरी,साजन गोहणे,विनोद चौधरी सुचिता लुटे, इमरान खान, राजकुमार गाडशेलवार,शाम आगदारी,संजय भोंगळे, संतोष कोडे,मुन्ना लोडे,नविन मोरे,ए. धूपे, अंकुश आंडारे,रोहन मिसाला, चंद्रकांत पालावार,विशाल दामेर,सुरज मोरपाका,मयुर कलवल, शाहरूख शेख,अनिल कांबळे,अनिस सिदधकी,
रमन तांडा,श्रीकांत मिशाला, शारदा गोडशेलवार, नितु जयस्वाल, पुनम मस्के,ज्योत्सना मस्के,माया मांडवकर, जनाबाई निमकर, सुशिला डाकरे, सुनिता चुने,कामिनी देशकर,भारती सौदार,सुनंदा सौदारी,अनिता गोवर्धन,
सारगरिका रामटेके,आशा भंडारकर,
शिवन्या मस्के,मनिषा शोरमंतवार, राजमनी सोदारी,संध्या जगताप,
दुर्गा सोपान मडावी, सोनु कामनवार
समिक्षा मडावी,रजनी टेकाम,
शालीनी खोबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
