#Ghugus
• ग्रामपंचायत ताडाळी येथे त्वचारोग शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम सपन्न
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घूस : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर व पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत ताडाळी येथे त्वचारोग शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमहाप्रबंधक देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत, याआधी झालेल्या डोळ्याच्या तपासणीत दृष्टिदोष आढळलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील महिलांची आणि मुलींची त्वचारोग तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचारही मोफत देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. निपा शाह मॅडम (CSR हेड, धारिवाल), धीरज ताटेवार (उपव्यवस्थापक, धारिवाल) आणि ग्रामपंचायत ताडाळीचे उपसरपंच निखिलेश चामरे यांचा समावेश होता. त्वचारोग तज्ञ डॉ. पल्लवी पदलमवार यांनी तपासणीची जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे, विशेषतः महिलांमधील त्वचारोगांसंदर्भातील समस्यांवर वेळेत उपाय उपलब्ध करून देणे आणि दृष्टिदोष असलेल्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे हा होता.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजुषा काकडे यांनी केले. तर यशस्वी आयोजनासाठी दिनेश कामतवार, सौ. ममता भोयर व सौ. सपना येरगुडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
