Home Breaking News #Ghugus •तहानलेल्यांना पाणी पाजण्याशिवाय दुसरे पुण्य नाही : प्रज्ञा राय •...

#Ghugus •तहानलेल्यांना पाणी पाजण्याशिवाय दुसरे पुण्य नाही : प्रज्ञा राय • निलजर्ई उपक्षेत्रात पाणपोईचे उद्घाटन

193

#Ghugus
•तहानलेल्यांना पाणी पाजण्याशिवाय दुसरे पुण्य नाही : प्रज्ञा राय

• निलजर्ई उपक्षेत्रात पाणपोईचे उद्घाटन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके 
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : रणरणत्या उन्हात थंडगार पाणी प्यायला मिळाले तर शरीराला दिलासा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्यांना थंडगार पाणी पिण्यास उपलब्ध करून देणे याशिवाय जगात दुसरे पुण्य नाही असे प्रतिपादन दामिनी महिला मंडळाच्या प्रज्ञा राय यांनी व्यक्त केले. वेकोली वनी क्षेत्राच्या नीलजाई उपक्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात दामिनी महिला मंडळाच्या वतीने कामगारांसाठी थंड पाण्याची पानपोई सुरू करण्यात आली .या पाणपोईच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या पाणपोईचे उद्घाटन प्रज्ञा राय यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी निलजर्ई उपशेत्रीय प्रबंधक गौतम राय, सर्वे अधिकारी आर. के .राय ,कार्मिक अधिकारी विनोद पाटील, सुनिता पवार, मंजू बोरडे, रेखा भागवत, कविता पाटील, जानकी राय, शिला यादव आदींची उपस्थिती होती वेकोलीच्या वणी क्षेत्रांतर्गत असलेल्या सदर दामिनी महिला मंडळातर्फे वर्षभर काही ना काही सामाजिक कार्य केल्या जात असते या अंतर्गत ही पाणपोईची सुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यात आली आहे.