#varora
• तांत्रिक वेतन श्रेणी व इतर मागण्यांसाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे वरोरा येथे बेमुदत काम बंद आंदोलन
• आमदार करण देवतले यांना निवेदन देण्यात आले.
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती – नागपूर या विभागीय संघटनेसी संलग्नित भूमी अभिलेख कर्मचारी संघटना शाखा वरोरा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी तांत्रिक वेतनश्रेणी पदभरती व इतर मागण्यांना घेऊन २६ मे ला बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले.
बेमुदत काम बंद आंदोलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आमदार करण देवतळे यांना निवेदन देण्यात करण्यात आले यात भूमि अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, परिरक्षक भूमापक यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, वर्जन २ व ईपिसीआयएस साईट सुरळीत करण्यात यावी, सर्व सर्वेअर यांना रोवर व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे, वर्ग दोन व तीन च्या रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित देण्यात याव्या, नवीन नगर भूमापन कार्यालयांची स्थापना करण्यात यावी. शासन निणऱ्याप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील पदनामांमध्ये बदल करण्यात यावा.
इत्यादी बाबींची आमदार साहेबांच्याहोता मार्फतीने शासनाकडे मागणी करण्यात आली. त्यानंतर दिवसभर कामकाज बंद ठेवण्यात आले. सद्या शेती हंगामाचा काळ असून अनेक मोजणीची कामे प्रस्तावित आहेत. इतर कागदपत्रांसाठी सुद्धा या कार्यर्यालयात आलेल्या अर्जदारांना काम बंदचा फटका बसला आल्यापावली परत जावे लागले.
या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये मुख्यालय सहाय्यक सचिन पवार,नारायण गुलाने निमतनदार, वंदना चिंचोलकर निमतनदार, विनोद सोनुरकर नजूल सर्वेक्षक, स्वरूप गौरकर,संदीप निमडगे, त्रिशाला जांभूळकर, स्वाती ताराम, अंकिता मुळे, सत्यम घोडमारे, दत्ता जाधव, राहुल काटकर, प्रेमानंद डोंगरे, रुपाली नैताम यांचा सहभाग होता.
