Home Breaking News • BSNL टॉवर उभे झाले मात्र जनता नेटवर्कच्या प्रतीक्षेतच •...

• BSNL टॉवर उभे झाले मात्र जनता नेटवर्कच्या प्रतीक्षेतच • तात्काळ टॉवर सुरु करा सुदाम राठोड यांची मागणी

239

• BSNL टॉवर उभे झाले मात्र जनता नेटवर्कच्या प्रतीक्षेतच

• तात्काळ टॉवर सुरु करा सुदाम राठोड यांची मागणी

सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

जिवती : तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो या भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. जिवती तालुक्यामध्ये विविध ग्रामपंचायतमध्ये BSNL चे टॉवर उभारून एक वर्षाच्या वरची कालावधी लोटून सुद्धा टॉवर सुरु झालेले नाही, विदयार्थ्यांना व समस्त नागरिक बांधवाना नेटवर्कची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटना जिवती तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी कनिष्ठ दुरसंचार अधिकारी राजुरा यांना निवेदन देऊन विनंती केली आहे कि जून च्या पहिल्या हप्त्यात सर्व टॉवर सुरु झाले पाहिजे अन्यथा शेतकरी संघटनेतर्फे सर्व टॉवर वर चडून विरुगिरी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शेतकरी संघटनेचे जिवती तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी केला आहे.