#Jivti
• स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बूथ बळकटीकरण करा :- गजानन पाटील जुमनाके
सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
जिवती :- येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. या साठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आणि प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे अश्यातच चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या राष्ट्रीय पक्षांचे गणिते बिघडवणाऱ्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आज जिवती येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक बूथ वरील कार्यकर्ता बळकटीकरण करून कामाला लागण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहे.
कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांच्या घरा घरापर्यंत पोहचण्याचे आवाहन गो. ग. पा. नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
राजुरा विधानसभा मतदार संघात गोंडवाना गणतंत्र पार्टीने 2019 आणि 2024 मध्ये विधानसभा निवडणुक लढवली होती, आणि बऱ्याच राजकीय पक्षांचे गणिते त्यांनी बिघडवले होते त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या भूमिकेकडे बऱ्याच राजकीय पक्षांचे लक्ष आहे, गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले तर राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
आज गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, तालुकाध्यक्ष हनुमंत कूमरे, नगरसेवक ममताजी जाधव, जमालुद्दिन शेख, माजी सभापती भीमराव मेश्राम, भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके, आनंदराव कोटणाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.




