Home Breaking News महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना आलेल्या जीवघेण्या धमकीप्रकरणी त्वरित कारवाई करा.

102

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना आलेल्या जीवघेण्या धमकीप्रकरणी त्वरित कारवाई करा.

सुवर्ण भारत पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

चंद्रपूर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना एका अज्ञात इसमाकडून निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिनांक १५ मे २०२५ रोजी त्यांनी एका दैनिकातून ‘सिंदूर ऑपरेशन’ संदर्भात व्यक्त केलेल्या मतानंतर ही धमकी प्राप्त झाली आहे. या पत्रात “माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ” असा थेट इशारा देण्यात आला आहे. ही घटना पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर व सुरक्षिततेवर घाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील पत्रकार बांधव याबाबत तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. अनेक तालुका व जिल्हास्तरावरून निवेदने देण्यात येत असून, संबंधित अज्ञात इसमाची त्वरीत चौकशी करून अटक करण्यात यावी व सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ सुरक्षा पुरवावी, अशी आमची मागणी आहे.

याबाबत लवकरात लवकर या घटनेतील आरोपीस अटक करून कठोर कारवाई केली गेली नाही, तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव व राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून न्याय मागणीकरीता संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास राव आरोग्य, उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली
आंदोलन करतील.

शासनाकडे खालील मागण्या सादर करण्यात येत आहेत.

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करण्यात यावी.
, सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे,सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन घुग्घूस पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सचिन तायवाडे यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे घुग्घूस शाखा अध्यक्ष सुरेश खडसे, कार्याध्यक्ष संजय पडवेकर, उपाध्यक्ष कल्याण सोदारी,तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष साहिल सैय्यद, संघटक पंकज रामटेके, कोषाध्यक्ष कयामूल हसन सिद्धिकी, सदस्य दशरथ आसपवार उपस्थित होते.