Home Breaking News लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे जागतिक पर्यावरण दिन समारंभ

लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे जागतिक पर्यावरण दिन समारंभ

101

लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे जागतिक पर्यावरण दिन समारंभ

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: दि.५ जुन २०२५ गुरुवार सकाळ रोजी लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात सर्वप्रथम मंचावर उपस्थित युनिट हेड वा.जी.एस.प्रसाद,उपाध्यक्ष प्रशांत पुरी,मुकेश बेलावे,मानव संसाधन अध्यक्ष पवन मेश्राम,गुणाकार शर्मा व युनियन संघटनेचे महामंत्री प्रशांत कौरासे यांचे स्वागत करण्यात आले.तसेच द्विपजवलीत करून सामुहिक सर्व कामगार कर्मचारी एकत्रित येऊन दोन्ही हात जोडून पर्यावरण दिनाचा प्रार्थना, शपथ घेण्यात आले. तसेच पर्यावरण दिनाचा बरेच कर्मचाराने स्लोगन काढण्यात आले व कंपनीचे सुरक्षा अधिकारी,वरिष्ठ प्रबंधकांनी कंपनीतील कर्मचारांना बक्षिस वितरण करण्यात आले.

प्लास्टिक प्रदूषणावर मात करा

पर्यावरण दिनानिमित्ताने कंपनीचा परिसरातील वृक्षारोपण करण्यात आले. कंपनीचे प्रमुख हेड वा.जी.एस. प्रसाद सर यांनी आपल्या मनोगतात कर्मचाऱ्याला सांगितले कि पर्यावरण दिन लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहित करतो. हा दिवस आपल्याला पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास प्रवृत्त करतो. वृक्षतोड थांबवणे आणि वृक्षारोपण करणे ही पर्यावरणाच्या हितासाठी केलेली सर्वोत्तम कृती आहे. पर्यावरणाशी सुसंगतता लक्षात घेऊन, एकेरी वापराचे प्लास्टिक न वापरता पर्यावरणपूरक अक्षय उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या सर्वांचे जीवन केवळ झाडांमुळेच शक्य आहे कारण आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन झाडातूनच मिळतो. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जीवघेण्या आजारांचे निदान झाडांच्या उपस्थितीनेच शक्य आहे. त्यामुळे जीवनात तसेच पर्यावरणातही आपण वृक्षांचे महत्त्व स्वीकारून पर्यावरणपूरक कार्य केले पाहिजे.

नवनियुक्त संघटनेचे महामंत्री प्रशांत कौराशे यांनी पर्यावरण दिनानिमित्त मनोगत व्यक्त करीत कामगार कर्माचारीला पर्यावरण बद्दल माहिती देण्यात आली.

याप्रसंगी सर्व सुरक्षा अधिकारी, कामगार कर्मचारी आवर्जून उपस्थित होवुन कंपनीतील परिसरातील वृक्षारोपण करण्यात आले.