Home Breaking News अशोक जाधव यांच्या ग्राम जिवन विकास संस्थे ला महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब...

अशोक जाधव यांच्या ग्राम जिवन विकास संस्थे ला महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हजारो लोकांच्या साक्षीने रोख रक्कम, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले 

483

अशोक जाधव यांच्या ग्राम जिवन विकास संस्थे ला महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हजारो लोकांच्या साक्षीने रोख रक्कम, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत. या मानाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वर्धा येथील राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स व सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव यांनी या संस्थेची स्थापना केली असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेने दैदिप्यमान यश मिळवलेले आहे. समाजातील दलीत, मागास, दुर्बल, व उपेक्षित घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत आलेले आहेत. जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने चौपेर प्रगती केलेली आहे.त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना व त्यांच्या संस्थेला महारष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत समाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था / व्यक्ती यांना प्रतीवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या वर्षाचा क्रमांक तीन चा पुरस्कार या संस्थेला देण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथील सभागृहात अतिशय भव्य व दिव्य वातावरणात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री श्रीमती माधुरी ताई मिसाळ, ना संजय भाऊ राठोड, मंत्री भरत जी गोगावले,खा.अरविंद सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.