Home Breaking News ⬜🌼🟨 दखल🌼🟥⬜

⬜🌼🟨 दखल🌼🟥⬜

141

⬜🌼🟨 दखल🌼🟥⬜

आपल्या मधूर व गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही आहे चंद्रपूरची गायिका रश्मि हिवरे!अर्थातच हिने अनेक कार्यक्रमातून गाऊन श्रोत्यांची मने जिंकली आहेत.मुळची ती अमरावती जिल्ह्यातील! शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तिचे अमरावती जिल्ह्यात पूर्ण झाल्यानंतर ती संगित विशारद झाली.गायनाची सुरुवात तशी तिची शालेय जिवनापासूनच!शाळा व महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात गायनाची संधी रश्मिने सोडली नाही.

आज तिचं वास्तव चंद्रपूर शहरातील समाधी वार्डात!

पती पेशाने वकील! कुटुंबातील सदस्यांचे नेहमीच तिला गायनासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.शहराच्या मध्यभागी तिचा एक संगित वर्ग!

याच वर्गात शेकडों विद्यार्थी संगिताचे प्रशिक्षण घेत आहेत.हजारों संगित सुगम कार्यक्रमात गायणारी रश्मि महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंची एक सदस्य!तीआज गायनासोबत बंजारा पंच लाईव्ह व सुवर्ण भारतच्या न्यूज चैनलची निवेदिकाची जबाबदारी नित्य पार पाडत आहेत.महाराष्ट्रभर रश्मिचं नांव परिचित आहे.मधूर गायनासाठी अनेक पुरस्कार तिला बहाल झाले.मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्या सहजं सुचलं मुळे मी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली अशी ती नेहमीच सांगत असते.