• चंद्रपूर शहरातील एम .ई. एल .प्रभाग तीन मध्ये वाढीव ट्रान्सफॉर्मर बसविण्याची युवा नेते जितेशदा

दा कुळमेथेंची मागणी!
सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर : किरण घाटे शहरातील एम. ई .एल .प्रभाग तीन मध्ये मागील एक महिन्यापासून सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असे.
उन्हाळ्यात विद्युत पुरवठ्याच्या लंपडाव मुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते.
शेवटी नागरिकांनी युवा नेते जितेशदादा कुळमेथे यांची भेट घेत त्यांनी या वार्डातील गंभीर समस्या त्यांना सांगितली.
कुळमेथे यांनी वेळेचा विलंब न लावता थेट येथील भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांच्या समोर या प्रभागाची समस्या मांडली .
त्या नंतर खुद्द आमदार जोरगेवार यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र दिले.
आज चंद्रपूरचे युवा नेते जितेशदादा कुळमेथे यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी चंद्रपूर यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना एम .ई .एल. प्रभाग तीन मध्ये वाढीव ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली.
त्यासोबतच संबंधित विभागाने या विषयास अती गंभीरतेने घेत विषय मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन त्यांना दिले असल्याची माहिती जितेशदादा कुलमेथे ह्यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना दिली.




