• आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
• आदर्श मुलगा घडवायचा असेल तर जिजाऊ मातेसारखे बना : आशिष मासिरकर
घुग्घुस : आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि. १७ जुन २०२५ मंगलवार रोजी आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजिक नेते आशीष मासिरकर यांच्या नेतृत्वात राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी बनविण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व सामुहिक नेते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आशीष मासिरकर म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या शिवरायांना लहानांपासूनच तलवारबाजी, विद्या कौशल्य, गनिमी कावा, घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, भालाफेक, कुस्ती खेळणे हे युद्ध कौशल्य त्यांना शिकवायच्या. राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सत्यात उतरवले.
स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊ मातेच्या फार मोठा हातभार आहे. एक आदर्श मुलगा घडवायचा असेल तर आजच्या प्रत्येक आईनं राजमाता जिजाऊंसारखे आचरण अंगिकारायला हवे.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने,
साजन गोहणे,सुचिता लुटे,भारती सौदारी, सुनिता पाटील,राजु सुर्यवंशी,राजु लुटे,महेंद्र बाग,संतोष लोढे,सन्नी मंडळ,श्रद्धा पोनाला व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
