Home Breaking News तळागाळातील गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करणारा जननायक म्हणजे स्व. पुंडलिकभाऊ ऊरकूडे – विवेक...

तळागाळातील गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करणारा जननायक म्हणजे स्व. पुंडलिकभाऊ ऊरकूडे – विवेक बोढे भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिदिना निमित्त गरजवंतांना भेट वस्तूचे वाटप

77

तळागाळातील गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करणारा जननायक म्हणजे स्व. पुंडलिकभाऊ ऊरकूडे – विवेक बोढे

भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिदिना निमित्त गरजवंतांना भेट वस्तूचे वाटप

 

घुग्घुस: येथील भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिदिना निमित्त बुधवार, १८ जुन रोजी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते गोर गरीब मुलांना, महिलांना व नपच्या कचरागाडीने कचरा गोळा करणाऱ्या महिलांना टिफिन बॉक्स, साडी, ब्लॅंकेट अश्या विविध भेट वास्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, साजन गोहने, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, श्रीकांत सावे, शाम आगदारी, कोमल ठाकरे, गणेश राजूरकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती.