• शहारूख यांच्या घरी ‘सिरोही की सुप्रसिद्ध तलवार’ जप्त
• भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल
रिपोर्टर ✍️भद्रावती तालुका प्रतिनीधी राजेश येसेकर
भद्रावती : शहरातील भंगाराम वार्डात रहाणार्या एका तरुणाकडून एक लोखंडी पाते असलेली मुठ, पिवळ्या रंगाच्या धातुच्या पात्यावर मराठीत “सिरोही की सुप्रसिद्ध तलवार” असे लिहून असलेली निमुळत्या टोकाची धारदार लोखंडी तलवार भद्रावती पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी सदरील तरुणावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेत जेरबंद करण्यात आले. शाहरुख बब्बु शेख (रा. भंगाराम वार्ड वस्ती भद्रावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त से की, भद्रावती येथील पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भंगाराम वार्डात रहाणारा शहारूख बब्बु शेख यांचा घरी पंचासमक्ष छापा टाकला. दरम्यान घराची झडती घेत तपासणी केली असता एक धारदार टोक असलेली तलवार बाळगून ठेवली असल्याचे आढळून आले.
प्रसंगी पंचासमक्ष तलवार जप्त करून आरोपीला ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत आरोपी शहारूख विरुद्ध अप. क्र. – २७५ /२२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहीती पोलीस सूत्रानुसार प्राप्त झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा नेतृत्वात गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टणकर, जगदिश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे यांनी केली.
