शासकीय आश्रम शाळा जिवती PM JANMAN योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण
जिवती : शासकीय आश्रम शाळा, जिवती येथे धरती आबा उन्नत ग्राम योजना /PM JANMAN योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्नप्रमाणपत्र,रहिवासी दाखला,राशन कार्ड, जनधन बँक खाते, आयुष्यमान भारत कार्ड, पी एम किसान कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, सिकलसेल ऍनिमिया आरोग्य तपासणी, नवीन विद्युत जोडणी इत्यादी सेवा सदर शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिर ठिकाणी जीवती तहसीलदार रूपाली मोगरकर, नायब तहसीलदार प्रदीप शील, गटविकास अधिकारी, लक्ष्मीनारायण दोडके एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर तसेच विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी हे शिबिर स्थळी उपस्थित होते.
