Home Breaking News अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित उद्या वरोऱ्यात विदर्भस्तरिय...

अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित उद्या वरोऱ्यात विदर्भस्तरिय समाज मेळावा गुणवंतांचा तथा पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा

75

• अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित

• उद्या वरोऱ्यात विदर्भस्तरिय समाज मेळावा

• गुणवंतांचा तथा पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी वरोरा

वरोरा : अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित विदर्भस्तरीय समाज मेळावा गुणवंतांचा तथा पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा 21 जून 2025 रो शनिवार सायंकाळी पाच वाजता नगर भवन हनुमान मंदिर जवळ वरोरा येथे मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था गजाननदादा साटोटे,उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथजी काटकर,प्रमुख अतिथी खासदार प्रतिभाताई धानोरकर,आमदार करण देवतळे,प्रदेशाध्यक्ष तुकारामजी वानखेडे,महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब लकारे,शिवसेना जिल्हाप्रमुख (उद्धव ठाकरे गट ) रवींद्र शिंदे,शिवसेना जिल्हाप्रमुख( शिंदे गट) नितीन मत्ते,अध्यक्ष भोई समाज सेवा संस्था वरोरा,दामोधरजी रूयारकर,महिला प्रदेशाध्यक्ष सविताताई डाहे,या मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
आयोजक विदर्भाध्यक्ष अल्का योगेश पचारे,जिल्हाध्यक्ष शिल्पा प्रकाश रुयारकर, जिल्हासाचिव रिया पचारे,वरोरा शहराध्यक्ष प्रेमिला रुयारकर,उपशहरध्यक्ष किरण नागपुरे,तालुका अध्यक्ष रिना मोरे,युवती जिल्हा सचिव स्नेहा करलुके,तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.