शेतीविषयक योजनेपासून वंचित /शेतकऱ्यांना फार्मर आयडी करिता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या:
भारत बिरादार
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी कृष्णा चव्हाण.
जिवती –
तालुक्यातील शेतकऱ्याचे ऑनलाइन सातबारा नसल्यामुळे जिवती तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शेतीविषयक योजनासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करता येत नाही व त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना याआधी योजना मंजूर झाली आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत तरी फार्मर आयडी नसल्यामुळे हजारो शेतकरी कृषी विभागाच्या योजनेपासून वंचित राहत आहेत तरी वरील बाबीची गंभीरता ओळखून शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावी फार्मर आयडी उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून द्यावी. तहसीलदराना शिवसेना (शिंदे गट) जिवती तालुका प्रमुख भरत बिरादार यांनी दिले निवेदन
