Home Breaking News • सौ आरती  डुकरे यांना मिसेस सुपर मॉम महाराष्ट्र अवार्ड ने सन्मानित.

• सौ आरती  डुकरे यांना मिसेस सुपर मॉम महाराष्ट्र अवार्ड ने सन्मानित.

68

• सौ आरती  डुकरे यांना मिसेस सुपर मॉम महाराष्ट्र अवार्ड ने सन्मानित.

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : नागपूर येथील सोनेरीपहाट बहुद्देशीय संस्था व्दारा आयोजित सुपर मॉम अवॉर्ड 2025 आणि किड्स फॅशन आयकॉन हा कार्यक्रम नागपूर येथील मंत्रा सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रेखा भोंगाडे. संचालक सोनेरीपहाट बहुद्देशीय संस्था नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा गणेशा दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. रितू चौधरी, अमृत इंगळे, रितू सिंग चव्हाण, शशांक पांडे, जबलपूर येथील चित्रपट दिग्दर्शक अभिनेता विकास पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. आरती कमलाकर डुकरे यांना मिसेस सुपर मॉम महाराष्ट्र या पुरस्कारांनी क्राउन्स ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले. सौ आरती कमलाकर डुकरे या नृत्य कलेत पारंगत असून राष्ट्रीय स्तरावर ही त्यांनी नृत्य कला सादर केली आहे. तसेच त्यांच्यात समाजसेवेची सुद्धा आवड आहे, त्या तालुक्यातील शाळेवर जाऊन देशाचे उद्याचे घडणारे नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा उपक्रम राबवित असतात आणि एक उत्तम व्यावसायिक सुद्धा आहे.

या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून रश्मी तिरपुडे, प्रार्थना मेश्राम, अनुरेता ढोलकिया, मीना बिसिन, शितल बावणे होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक समितीने परिश्रम घेतले.
सौ आरती कमलाकर डुकरे यांनी आपल्या यशाचे श्रेय मुलगी आरोही डुकरे, मुलगा अधिराज डुकरे, पती कमलाकर डुकरे यांना देण्यात आले