• डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीनी देशाच्या एकते व अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले: किरण बोढे
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा कें

द्रातर्फे सोमवार, २३ जुन रोजी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ चा नारा देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, अमर हुतात्मा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे’ अशी घोषणा देत काश्मीरमध्ये सत्याग्रह केला व आपले बलिदान दिले. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना झाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी सरकारच्या काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या निर्णयाला विरोध केला व त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की ‘एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे.’ सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरु केले याचाच एक भाग म्हणून त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याचा निर्माण घेतला. काश्मीरमध्ये त्यांना अटक करण्यात आली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीना बंदी म्हणून ठेवण्यात आले. २३ जुन १९५३ ला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्वर्गवास झाला. जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे या मागणीसाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी त्यांचे सर्वोच्च कार्य व सर्वोच्च बलिदान होते.
यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभीडकर, जाई आत्राम, हनुमान खडसे आदींची उपस्थिती होती.
